वाट बघायचं दुःख
नशिबातूनच चुको
देवा कोणाच्याहि
घराला खिडकीच नको
दारं हवी तर ठेव
जास्त
मोकळी हवा खेळेल
मस्त
उंबरठ्यावरची
पावलं एकाच दिशेला झुको
देवा कोणाच्याहि
घराला खिडकीच नको
दे छप्पर मोठ्ठ
त्यात
सगळेच पुरतील
आरामात
चणचण आणि वणवण
यांनी ना कोणी थको
देवा कोणाच्याहि
घराला खिडकीच नको
भिंतींचा असुदे
मजबूत आधार
टिकवून ठेव
त्यांचा कायम निर्धार
तुळस मात्र घरची
कधीच ना सुको
देवा कोणाच्याहि
घराला खिडकीच नको
...भावना