मुलीत मुलगा
वेगळा काढू
बाबांना आपण एकटं
पाडू
जमवू दोघी गट्टी,
तुझी नि माझी बट्टी
गुपित माझं
तुझ्याच कानात
तुलाच कळलं,
काय माझ्या मनात
बाकी सगळ्यांना
सुट्टी, तुझी नि माझी बट्टी
तुझंच म्हणणं
बरोबर धरू
बाबांवर आपण सरशी
करू
बाबा फारच हट्टी,
तुझी नि माझी बट्टी
बाबांना काही
समजत नाही
मीच खरी परी ना ग
आई?
म्हणाले ते मला
छोट्टी, तुझी नि माझी बट्टी
बाबा बसलेत हताश
होऊन
वेळ घालवतात
पेपरात पाहून
त्यांची सोडूया
का कट्टी?...
तुझी नि माझी तर बट्टी
...भावना