स्वैर आभाळात
भरारी, घरटे अभंग
तुझ्या सोबतीत
माझा, होतो रे विहंग
खांद्यावरून
लाटेच्या ती, उंच करून मान
डोकाऊन पाहत होती, हरपले भान
त्या दुसऱ्या
लाटेचा रे, किनाऱ्यास संग
तुझ्या सोबतीत
माझा....
सागराच्या
भेटीसाठी, ठेचाळत वाट
दऱ्या खोऱ्या पार
करुनी, धावली पिसाट
सरितेच्या
उर्मीचा ही, ना कधी भंग
तुझ्या सोबतीत
माझा....
ना थकले चालून पाय, दिवस मोजताना
रोज निशा हरखून
जाते, चंद्र पाहताना
कोमेजते, दिसला नाही जर शुभ्ररंग
तुझ्या सोबतीत
माझा....
आभाळाची ओढ तिला, दूरवर नेते
धरणी मग
क्षितिजावरती, एकरूप होते
सजली किती बघ ती
वेडी, विचारात दंग
तुझ्या सोबतीत
माझा....
...भावना