Saturday, 14 February 2015

दारावरची आपल्याच नावाची पाटी…


बंदिस्त रहायला अनेक भिंती आहेतच

एक दार तरी सगळ्यांसाठी उघडं ठेऊया 

आपल्या दारावरची आपल्याच नावाची पाटी आता तरी काढूया

 

मावशी, आत्या, काकू, मामी

नात्यांचं वैविध्य नाही आपल्याकडे कमी

फ्लाट मध्ये राहून त्यांची सरसकट आंटी नको करूया

दारावरची आपल्याच नावाची पाटी आता तरी काढूया

 

फळवाला, भाजीवाली असे मित्र मैत्रिणी आता

कसे जपणार त्यांना बिल्डींग मध्येच घेता

अटलिस्ट दाराशी येणाऱ्याला पाणी तरी देऊया 

मुंगीलाही डोकावता येणार नाही असं पीपहोल जरा मोठ्ठ करूया   

दारावरची आपल्याच नावाची पाटी आता तरी काढूया

 

बंद दारालाही छान दिसायचं बंधन

नक्षीदार बोर्डर आणि स्टेटसचं कोंदण

वर कुलूप, latch, चेन अशी अनेक ओझी नको वाढवूया

प्लस आणखी एक सेफ्टी डोअर  तरी नको बसवूया 

बिचाऱ्या दारावर तरी विश्वास ठेऊया

आपल्या दारावरची आपल्याच नावाची पाटी आता तरी काढूया

...भावना