Monday, 16 February 2015

आईचा मेकअप...


आधी लिहावा ठरवलं तिच्यावर मोठ्ठा लेख
मग खाली लिहावी सुंदर कविता एक

वर तिचा छान फोटो हि लावावा
आई म्हटलं आज तुला मेकअप हवा

 
सकाळी बाबांचं ऑफिस, दुपारी माझ्या शाळेची घाई
आई मला स्वस्थ कधी दिसलीच नाही

संध्याकाळी सांगितलं तिला, शाळेत मला मिळालं बक्षीस
बाबा हि आले तितक्यात आज लवकर सुटलं ऑफिस

 
आई हसली गोड, एकदम फोटोसाठी फिट
मला कळला तेंव्हा… तिच्या मेकअपचा कोणता आहे किट!

...भावना