Wednesday, 11 February 2015

गुलाबी झाली आज संध्याकाळ….


ओठांची लाली नभाला भावली
सूर्यांनी टिकली जपून ठेवली

वाराहा गुंतून गेला बटांशी
थांबला श्वासांचा ठेका लाटांशी

नादात दिशांचाच जुळेना मेळ
पक्षांनीहि ओळखली एकांताची वेळ

कुणाच्या रंगात गेली ती भिजून
गुलाबी झाली आज संध्याकाळ लाजून

...भावना