हक्कानी मागते चौथी सीट
आता मी झाले आहे पुरती धीट
कर्जत ते व्हीटी अप
आणि डाऊन
मी रोज जाते
तुम्हीही बघा जाउन
विचारानीच आली ना
तुम्हाला फिटपण आता मी झाले आहे पुरती धीट
मस्टर च्या वेळा
लेट मार्क टाळाकसरत मला जमतेय एकदम नीट
कारण मी झालेय
पुरती धीट
सकाळच्या लोकलमधेच ब्रेकफास्ट होतो
संध्याकाळी
गप्पांना बहर येतो
शिवाय वेळ जायला
आहे शिलाई कीट
आता मी झाले
आहे पुरती धीट
गाडीत गर्दी असह्य होते
तरी सगळ्या
माझ्या मैत्रिणी तिथे
रेसिपीही सांगतात काकू भाजी
निवडीत
म्हणून मी झाले
आहे पुरती धीट
आयुष्यच जेव्हा फास्ट ट्रेन
होते
खूप ताण, सहनशक्ती
परीक्षा पहाते
पण मिळवेनच मी त्यात
चौथी तरी सीट
कारण आता मी
झाले आहे पुरती धीट
...भावना