पाणी थांबतं एकाच जागी,
तेंव्हा होतं ते
गढूळ
वय वाढलंच नाही जर,
तर ठरतं ते
एक खूळ
वाहणाऱ्या हवेच्या श्वासात, असतं
जिवंतपण
प्रत्येक आयुष्याच्या अस्तानंतरच, जन्मत
दुसरं बालपण
विचारांच्या
प्रवाहाचा, असाच हवा
वाहता झरा
साचवून ठेवलेल्या गोष्टींचा, कधीच
होत नाही निचरा
...भावना