Monday, 16 February 2015

खाली एकदातरी भेटू…


एकमेकांच्या चुकांची पुस्तकं कधीतरी मिटू
वर जाण्याआधी खाली एकदातरी भेटू

 
घट्ट मिटून डोळे
सुंदर क्षण आठवू सगळे

कुसळ आणि मुसळ यांची मापं विसरू
भूतकाळातल्या छोट्या डागांवर नवीन वर्तमान पसरू

एकमेकांच्या चुकांची पुस्तकं कधीतरी मिटू

वर जाण्याआधी खाली एकदातरी भेटू


वरच्या वाटेनीच जायचं आहे शेवटी
तिथे हि होतील कि मग गाठी भेटी

तरीही सोप्पं नाही का आज, इथे, आत्ता भेटणं
नाहीतर फक्त उरेल हुरहूर वाटणं

एकमेकांच्या चुकांची पुस्तकं कधीतरी मिटू
वर जाण्याआधी खाली एकदातरी भेटू

...भावना