सुखाची आपली व्याख्या,
आपणच ठरवायला हवी
प्रत्येकाच्या
तिजोरीची त्याच्याकडेच असते चावी
इंद्रधनुष्याच्या
रंगांचा करू नये
हेवा
त्यालाही लागतोच पाठीच्या दुखण्याचा
भार वहावा
वाटतं आपल्याला झाडाचच जीवन
छान, नाही ते
परावलंबी
पण एकाच जागी
संपते त्याच्या, सगळ्या
अनुभवांची लांबी
हिऱ्यालाच का लकाकण,
हा ठेऊ नये
ठपका
त्याच्या स्वतःच्या डोळ्यांनी त्याला,
दिसत नाही साधा
ठिपका
सुखाच्या अनुभूतीच एकंच असतं
गुपित
अत्तर असतं सुरक्षित,
ज्याचं त्याच्या कुपीत ...भावना