माझ्या मनाचं मोरपीस
कैक रंगांची हि जादू
कधी ओल्या, हळव्या क्षणी
हाती घेऊन पहा
तू
माझ्या मनाचं मोरपीस
माझ्या मनाचं मोरपीस
त्याला ठेव पुस्तकात
तुझ्या आयुष्याचे पान
ते हि वाचेल
निवांत
माझ्या मनाचं मोरपीस
माझ्या मनाचं मोरपीस
एक मुल अवखळ
आहे लबाड हा
वारा
त्या पासून तू सांभाळ
माझ्या मनाचं मोरपीस
माझ्या मनाचं मोरपीस
अलगद, मऊ स्पर्श
त्याला नाजूक हाताळ
देईल ते फक्त
हर्ष
माझ्या मनाचं मोरपीस...
...भावना