याला अंथरूण
त्याला पांघरूण
मग मला कसं
आणि काय उरतं
मी सुख शोधतोय
आधी माझ्या पुरतं
अर्धा भरलेला पेला
तत्वज्ञानातच दिसला
एकेका थेंबासाठी इथे जगणं
थांबतं
मी सुख शोधतोय
आधी माझ्या पुरतं
इथे पैशाला माज
जिथे उरत नाही
लाज
काय विकू आणि
काय झाकू, म्हणतच
गणित अडतं
मी सुख शोधतोय
आधी माझ्या पुरतं
एक होतो नेता
दुसरा आरक्षित काहीही न
करता
त्रिशंकू असणं मलाच
सतत सलतं
मी सुख शोधतोय
आधी माझ्या पुरतं
भूतकाळाची जाण
भविष्याचा ताण
नीतिमत्तेचंच
ओझं नडतं
मी सुख शोधतोय
आधी माझ्या पुरतं
मोडकं मनगट, वाकलेला
कणा
याच आमच्या जन्मखुणा
मध्यमवर्ग आणि स्वर्ग
हे यमक कवितेतच फक्त जुळतं
मी सुख शोधतोय आधी
माझ्या पुरतं
...भावना